बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महत्त्वाची बातमी! लसीच्या दोन डोसमध्ये असावं इतक्या दिवसांचं अंतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. याआधी सरकारच्या विशेषतज्ज्ञांचं एक पॅनल ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकानं दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजत आहे.

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर सहा ते आठ आठवडे इतकं आहे. मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार हे अंतर वाढवण्यात आलं असून पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमधील अंतर हे बारा ते सोळा आठवड्यांनंतर म्हणजेच तीन ते चार महिन्यांनंतर दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविशिल्डचे दोन डोस 12 आठवड्यांच्या अंतरानं घेतल्यास ते 81.3 टक्के प्रभावी ठरतात. याशिवाय कमी कालावधीबाबतही आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, लसीचे दोन डोस सहा आठवड्यांपेक्षा कमी काळात घेतल्यास याचा प्रभाव केवळ 55.1 टक्केच होतो. दोन्ही डोसध्ये ठेवण्यात येणाऱ्या अंतरामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

दरम्यान, कंपनीनेही असा दावा केला आहे, की लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास त्याचा प्रभाव 28 टक्क्यांनी वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. इतर देशातही दोन डोसमध्ये बऱ्याच कालावधीचं अंतर आहे.  दोन डोसमधील अंतर वाढवल्याने लसीच्या पुरवठा साखळीवरील दबावही कमी होण्यास मदत होण्याचा अंदाजही वर्तवला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“ठाकरे सरकार करीना कपूर, कतरिना आणि दिशा पटानी यांच्याकडून पैसे देऊन ट्विट करून घेतात”

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

म्युकरमायकोसिस संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

काळजी घ्या, धोका वाढतोय! पुण्यात नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला, वाचा आजची आकडेवारी

विनाकारण बाहेर पडणारांनो ‘हा’ व्हिडीओ पाहा, बाहेर पडायची हिम्मत होणार नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More