बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंबानींच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आता मनसेची उडी; बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप

मुंबई | सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांंनी भरलेल्या सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यांनी या प्रकरणावरून बड्या मंत्र्यावर आरोप केला आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून, की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा तपास होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे.  हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. वसईमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी या प्रकरणात निलंबन झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरही भाष्य केलं आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन सापडणं,  हे फार मोठं गंभीर प्रकरण आहे, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. तर हे सर्व प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आले आहे. सध्या या प्रकरणाचा एनआयए व्यवस्थित तपास करत असल्याचं अविनाश जाधव म्हणाले.

दरम्यान, अवघ्या 2 ते 3 दिवसात मोठी पत्रकार परिषद होणार असून यात राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार असा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे. तर विरोधी पक्षाने शिवसेनेवर वाझेंवरून गंभीर आरोप केले आहेत. मी मुख्यमंत्री असताना मला शिवसेनेच्या नेत्यांनी वाझेंना पुन्हा कामावर लावण्यासाठी दबाव टाकला असल्याचा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. एकीकडे या प्रकरणावरून विरोधी पक्ष राज्य सरकारवर टीका करत आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठी पाऊलं उचलली आहेत. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची वर्णी लावली आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

करुणा शर्मा आता राजकारणाच्या आखाड्यात, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा- चंद्रकांत पाटील

मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत?; आतापर्यंत केलीय ‘ही’ जबरदस्त कामगिरी

‘पुरावा असेल तर…’; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More