नवी दिल्ली | देशात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आता शंभरी पार केली आहे. त्यामुळे अनेक पंपचालकांनी इंधनाची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगाने वाढणाऱ्या मीटरकडे जाईल तेव्हा लक्षात घ्या की कच्या तेलाचे दर वाढले नाहीत तर कमी झाले आहेत. पेट्रोल 100 रुपये प्रती लिटर झालं असून तुमचा खिसा रिकामा करुन मित्रांना देण्याचं मोठं काम मोदी सरकार मोफत करत आहे, अशी सणसणीत टीका राहुल गांधींनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
राहुल गांधींनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार 2014 मध्ये मोदी सरकार आलं तेव्हा पेट्रोल 71 तर डिझेल 57 रुपयांनी होतं. मात्र गेल्या 7 वर्षात कच्चा तेलाची किंमत कमी झाली तरीही पेट्रोल आणि त्या पाठोपाठ डिझेलच्या किंमती सेंच्यूरी मारत आहेत. 15 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 यादरम्यान पेट्रोल 17.05 तर डिझेल 14.58 रुपयांनी महाग झालं आहे.
दरम्यान, वाढत्या इंधन दरवाढीमुळे मध्य प्रदेशचे वैद्यकीय मंत्री विश्वास सारंग यांनी मोदींच अभिनंदन केलं आहे. इलेक्ट्रीक मोटर भारतात आणण्याच्या मोदींचा या निर्णयामुळे कच्चा तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींवर मजबूत नियंत्रण ठेवता येईल. बाजारातील आंतरराष्ट्रीय मागणी आणि पुरवठ्यामुळे तेलाचे दर कमी झाले आहेत. तसेच सौर ऊर्जेचा आणि इलेक्टाॅनिक ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल मोदींचे आभार मानायला हवे, असं सारंग यांनी म्हटलं आहे.
पेट्रोल पम्प पर गाड़ी में तेल डालते समय जब आपकी नज़र तेज़ी से बढ़ते मीटर पर पड़े, तब ये ज़रूर याद रखिएगा कि कच्चे तेल का दाम बढ़ा नहीं, बल्कि कम हुआ है।
पेट्रोल 100 रुपय/लीटर है।
आपकी जेब ख़ाली करके ‘मित्रों’ को देने का महान काम मोदी सरकार मुफ़्त में कर रही है!#FuelLootByBJP
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 22, 2021
थोडक्यात बातम्या-
जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे
‘आमच्या जिल्हयात सामना येतचं नाही’; पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
बॅंकेत कर्मचारी सांगून केलं लग्न पण डोळ्याअंधारी करायचा ‘हे’ उद्योग
‘कृष्णकुंजवर न्याय मिळतो’; मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार
पेट्रोल-डिझेल दर वाढीबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला मोठा खुलासा!