बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महत्त्वाची बातमी! कोरोनाचा संसर्ग हवेतून होण्याचा धोका, केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने सर्व देशभरात हैदोस घातला आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला. मात्र अशातच कोरोना नसलेल्या लोकांकडूनसुद्धा कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्या कार्यालयाने काही नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशांकडून कोरोना कसा पसरू शकतो, तर कोरोनाबाधित रुग्णांचे एअरोसोल्स 10 मीटर दूरवर हवेत पसरू शकतात, तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत पसरू शकतात. कोरोनाबाधित व्यक्तीची लाळ आणि नाकातून शिंकेद्वारे बाहेर पडणारे थेंब श्वास घेताना अथवा बोलताना, गाताना, हसताना, खोकताना बाहेर पडल्यामुळं कोरोना व्हायरसचं प्रमाण वाढतं.

नवीन गाईडलाईन्सनुसार लोकांनी मास्क वापरणं चालू ठेवावं, एकावर एक असे दोन मास्क किंवा एन 95 मास्कचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. सर्जिकल मास्कच्या जागी दोन सूती मास्क देखील घातले जाऊ शकतात. सर्जिकल मास्क फक्त एकदाच वापरला पाहिजे. याशिवाय दरवाजाची हँडल, स्विचबोर्ड,  टेबल-खुर्च्या अशा अधिक संपर्कात येणार्‍या वस्तू स्वच्छ ठेवल्या पाहिजेत, असंही केंद्र सरकारने सूचवलं आहे.

दरम्यान, पंखा योग्य ठिकाणी लावावा आणि दारे, खिडक्या थोड्या उघड्या ठेवल्यास हवेची गुणवत्ता देखील सुधारते. खिडक्या आणि दारे बंद ठेवून संक्रमित हवा खोलीत सतत गोळा होत राहते. यामुळे दुसर्‍या व्यक्तीलाही हा संसर्ग पसरण्याचा धोका वाढत असल्याचं सरकारने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! रेमडेसिविर इंजेक्शन आता कोरोना रूग्णांना दिलं जाणार नाही; WHO ने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

भारताच्या प्रमुख गोलंदाजावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडिलांचं निधन

पुणे | भाच्याने मामाला घातला गंडा, रक्कम ऐकून हैराण व्हाल

….म्हणून डॉन अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त!

बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा; भावानेच आपल्या 5 वर्षाच्या बहिणीसोबत केलं ‘हे’ किळसवाणं कृत्य

कौतुकास्पद! गरोदरपणाच्या काळात घरबसल्या तयार केलं कोरोना चाचणीचं किट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More