बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मित्राची गाडी वाचवण्याच्या नादात स्वतःच वाहून गेला, पाहा व्हिडीओ

वर्धा | राज्यातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. एवढंच काय तर कोकणातील चिपळून येथे देखील पावसामुळे आलेल्या पुराने सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. अशताच वर्धा येथे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरुणाला त्याचा मित्र मदत करण्यासाठी गेला. मात्र गाडीला वाचवण्याच्या नादात स्वतःच वाहून गेला.

वर्धा येथील पूराची स्थिती पाहून तेथील लोकांना स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच एक तरुण आपली दुचाकी घेऊन पूल ओलांडत असताना त्याला एकट्याला पाण्याच्या प्रवाहात गाडी आवरत नव्हती. आपल्या मित्राची मदत करण्यासाठी एक तरुण पुढे सरसवला आणि मित्राला मदत करण्यासाठी त्याच्या जवळ गेला.

दरम्यान, पाण्याचा प्रवाह इतका होता की गाडी पाण्यासोबत वाहत होती. अशातच गाडी मालक असलेल्या तरुणाने गाडी सोडली. मात्र मदतीला आलेल्या मित्राने गाडी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आखेर पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ तेथे उपस्थित असलेल्या कोणीतरी रेकाॅर्ड केला आहे.

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या घटनेनंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. अनेक गावातील बंधारे, ओढे पाण्याने भरले असून आत्तापर्यंत 112 जणांचा जीव गेला आहे.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

“माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं”

भारताला मोठा धक्का, सानिया-अंकिताची जोडी पहिल्याच फेरीत बाहेर

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’; अजित पवार भडकले

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला; कोल्हापुरातील धक्कादायक व्हिडीओ समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More