Top News महाराष्ट्र लातूर

रात्री गावी जाण्याची सोय नव्हती; तरुणांनी केलेल्या प्रकारानं एसटी महामंडळाची झोप उडाली!

लातूर | लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद बस स्थानकातून एक धक्कादायक प्रकार समोर आला अहे. दारुच्या नशेत काही तरूणांनी चक्क एसटीच  पळवून नेल्याचं कृत्य केलं आहे.

शेळगी गावातल्या काही तरुणांनी रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्यानं त्यांनी चक्क बस स्थानकातून एसटीच पळवून नेली आहे.

एसटी पळवत असताना विजेच्या दोन खांबाना धडक लागल्यानं विजेच्या तारा तुटून खाली पडल्या आणि विजेचे खांब देखील कोसळले आहेत.

दरम्यान, बस स्थानकात झोपलेल्या वाहक आणि चालकाला जाग आली तेव्हा एसटी जागेवर नसल्याचं समजताच त्यांनी औराद पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी सापडली. या घटनेत एसटीचं 25 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

चुलता पंतप्रधान असताना भाजपनं पुतणीला तिकीट नाकारलं, वाचा सविस्तर!

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच, या नेत्याची होऊ शकते निवड!

“बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि स्मारक न बांधणं याला टाईमपास बोलतात”

“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या