मुंबई | पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या आत्महत्येला राज्य सरकारमधील एका मंत्र्याचं नाव घेतलं जात असल्याने विरोधी पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनीही या प्रकरणावरून थेट राज्य सरकारवर आरोप केला आहे.
पूजा चव्हाणची सुरुवातीला आत्महत्या आहे असं समोर आलं होतं मात्र जे काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाले आहेत तर काही पुरावे समोर आले आहेत. जेव्हा असे पुरावे बाहेर येतात तेव्हा सुमोटो अॅक्शन घेणं गरजेचं आहे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. मागच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर अशा प्रकारचे आरोप झाले होते आणि आता या सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप होत आहे. राजकीय दबावापायी ही प्रकरणं दाबल्याचा प्रयत्न होत आहे. हे अजिबात होता कामा नये, असं म्हणत देसाईंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
संबंधित मंत्र्यांचा काही हात असेल तर पुणे पोलिसांनी तात्काळ गंभीर दखल घेऊन चौकशी करावी. जेव्हा असे पुरावे बाहेर येतात तेव्हा सुमोटो अॅक्शन घेणे गरजेचं असल्याचं देसाई म्हणाल्या.
दरम्यान, गेल्या महिन्यातही एका मंत्र्यावर आरोप झाले होते मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही. नंतर करुणा शर्मा यांच्याप्रकरणी कोणतीही कारवाई करत नाही. यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर असं काही समोर येतं आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”
‘नाद करा पण आमचा कुठं’, हेलिकॉप्टरमधून येत ‘या’ गावच्या सरपंचानं घेतली शपथ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!
“जनतेने मोदी सरकारला देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची फडणवीसांनी गंभीर दखल घेत ‘त्या’ ऑडिओ क्लिप डीजींकडे पाठवल्या
Comments are closed.