बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#उद्धव_माफी_माँगों ट्विटरवर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड? जाणून घ्या!

मुंबई | सोशल माध्यमांमधील ट्विटरवर सध्या #उद्धव_माफी_माँगों हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी या हॅशटॅगच्या माध्यमातून होत आहे. मात्र नक्की कोणत्या कारणामुळे ही मागणी होत आहे?, तर जळगावमध्ये घडलेल्या लज्जास्पद प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याची मागणी होत असून त्यामुळे ट्विटरवर #उद्धव_माफी_माँगों हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात पोलीस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. जळगावमधील गणेश कॉलनीमधील आशादीप वसतीगृहामधील निराधार आणि अत्याचार झालेल्या पीडित महिला राहतात. मात्र तेथील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पोलीस कर्मचारी आणि बाहेरील इतर पुरुष कपडे काढून महिलांना नाचायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृहात पाहणी दौरा करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी वसतिगृहाच्या खिडकीतून तेथील महिलांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी त्यांच्यासोबत होत असलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली.

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. जळगावच्या घटनेच्या चौकशीसाठी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला- नितेश राणे

“दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?”

…म्हणून महिला पोलिसाने दिली आपल्या पतीची सुपारी

‘सरकारला लाज वाटली पाहिजे’; प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More