बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह! घरगुती गॅस सिलेंडरवर 900 रुपयांचा कॅशबॅक; ‘ही’ आहे भन्नाट ऑफर!

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे अगोदरंच सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेल बरोबरंच आता देशांतर्गत घरगुती गॅस सिलेंडरचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. यामुळे ‘कॉमन मॅन’ चांगलाच त्रस्त झाला आहे. अशातच आता डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएमने एलपीजी सिलेंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे.

एलपीजी सिलेंडर ग्राहक आयव्हीआर, मिस्ड कॉल आणि व्हाट्सअॅपद्वारे सिलेंडर बुक करू शकतात. कोणत्याही प्रकारे बुक केलेल्या सिलेंडरचं पेमेंट पेटीएमने करता येते. पेटीएम अॅपवरुन 3 एलपीजी सिलेंडर बुकवर ग्राहकांना 900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅश मिळणार आहे.

900 रुपयांपर्यंतचा हा कॅशबॅश पेटीएमवर पहिल्यांदा एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम केवळ या कंपण्यांच्या एलपीजी सिलेंडरवरच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या चोरीचं प्रमाण वाढत चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंडर दिला जाणार आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना सिलिंडर घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

थोडक्यात बातम्या – 

औरंगाबादमधील ‘या’ आमदाराने भर चौकात केली बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण; पाहा व्हिडीओ

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही- राजेश टोपे

शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More