बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! कोरोनाबाधित क्षेत्रासाठी 1.1 लाख रुपयांचा निधी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | सध्या देशभरात कोरोनाचं संकट घोंघावत असतानाच केंद्रिया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाधित क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे.

निर्मला सीतारामन यांनी कोरोनाबाधित क्षेत्रासाठी 1.1 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा आज पत्रकार परिषदेमार्फत केल्याचं पाहायला मिळालं. तसेच इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी सिस्टिमसाठी निधी वाढवण्याची घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी आज केली.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागासाठी एकूण 50 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हे संपूर्ण पैसे नॉन मेट्रो मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च करण्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे. इतर विभागासाठी 60 कोटींची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

आता इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 3 लाख कोटी रुपयांचा निधी वाढवून 4.5 लाख कोटी रुपयांवर करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या –

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबीलनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

…नाहीतर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

“संजय राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”

प्रत्येक दलित कुटुंबाला 10 लाख रुपये मिळणार; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तानी तरुणी पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात, देशात येण्यासाठी थेट मोदींकडे विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More