‘या’ कंपनीची 1.21 कोटींची कार फक्त 14 लाखाला! ग्राहकांची बुकींगसाठी धावपळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नवीन कार घ्यायची म्हणलं की आपण काही ऑफर आहेत का हे पाहतो. तशीच एक ऑफर सध्या एका कारवर मिळत आहे. यामुळेच ग्राहकांची सध्या धावपळ सुरु झाली आहे. जगप्रसिद्ध लग्झरी कार पाेर्शे (porche) हीची सुरुवातीची किंमतदेखील 80 लाखांपासून सुरु होते.

पोर्शेच्या Panamora या माॅडेलची किंमत 1 करोडपासून सुरु होते. तेच Panamora चे माॅडेल 14 लाखात मिळत असल्यामुळं नागरिकांनी घ्यायला धावपळ आणि गोंधळ केला होता. सत्य परिस्थिती मात्र काही वेगळीच निघाली. चुकीच्या पसरत गेलेल्या जाहिरातीमुळे आणि चुकीच्या छापलेल्या किमतीमुळे हा गोंधळ झाला आहे.

उत्तर चीनमधील (North China) यिमचुआन शहरातील एका पोर्शे डीलरने ऑनलाइन जाहिरातीमध्ये पोर्शेच्या Panamora या माॅडेलची किंमत चुकीची दाखवली. मूळ किमतीपेक्षा कितीतरपट कमी किंमत त्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आली. जाहिरात पाहिल्यानंतर लगेचच ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. बरेच लोक जेव्हा डीलरपर्यंत जाऊन पोहचले तेव्हा त्यांना कळलं की ही एक बनावट जाहिरात होती.

काहींनी कार बुक देखील केली होती. कंपनीला या बाबतीत कळताच कंपनीनं ग्राहकांची माफी मागितली आहे. ग्राहकांची बुकींग अमाऊंट देखील परत केली आहे. दरम्यान, चुकीची जाहीरात करण्यात आलेली Panamora कार 5 सीटर आहे. या पोर्शेच्या Panamora चं मायलेज 10.75 Kmph आहे.

महत्त्वाच्या बातम्या