बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

नवी दिल्ली | केंद्र सरकारने 1 जूलै 2017 पासून एकच कर म्हणून संपूर्ण देशात जीएसटी कायदा लागू केला आहे. जीएसटी कायदा लागू केल्यानंतर जीएसची संकलनाची सोमवारी आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये जीेएसटीच्या कराची विक्रमी वसुली झाली आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये जवळपास 1.3 लाख कोटी रूपयांचे जीएसटी संकलन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 24 टक्के अधिक कर सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.

केंद्र सरकाराच्या तिजोरीत यावेळी 1,30,127 कोटी रूपये जीएसटी म्हणून प्राप्त झाले आहेत. यामध्ये सीजीएसटी 23,861 कोटी रूपये, एसजीएसटी 30,412 कोटी आणि आयजीएसटी 67,361 कोटी कर जमा झाला आहे. यात वस्तूंच्या आयतीवर 32,998 आणि उपकर 8,484 कोटी जमा झाला आहे.

दरम्यान, या वर्षी एप्रिलमध्ये 1.4 लाख कोटी रुपये जीएसटी कर जमा झाला होता. ऑगस्टमध्ये 1,12,020 कोटी, जुलैमध्ये 1.16 लाख कोटी रूपये होते. तर जूनमध्ये 92,849 कोटी रूपये होते आणि मे महिन्यात 98,000 कोटी रूपया कर सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1.41 लाख कोटी रूपये होते.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या-

“वाघ डरकाळी फोडू शकतो हे त्यांनी दाखवून द्यावं”

‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’; अमृता फडणवीसांचा सवाल

”तो’ लपून बसला नाही, तो सध्या…’; प्रभाकर साईलच्या वकिलांचा मोठा खुलासा

अभिनेत्री दिव्या भारती यांच्या वडिलांचे निधन; साजिद नाडियाडवालाने दिली अखेरपर्यंत साथ

‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असाल तर…’; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More