मनोरंजन

क्वीन कंगणा एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते 1.5 कोटी तर पुर्ण चित्रपटासाठी…..

मुंबई | बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगणा राणावत सध्या महाराष्ट्र सरकारसोबत चालू असलेल्या संघर्षामुळे संपुर्ण देशभर चर्चेत आहे. मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संघर्ष चालू झाला. याच पार्श्वभूमीवर  मुंबई महापालिकेने कंगणा राणावतच्या कार्यालयावर कारवाई केली.

कंगणा राणावतच्या एका ऑफिसचं नुकसान झालं आहे मात्र कंगणा घाबरली नाही. कंगणा तशी आक्रमक स्वभावाची आहे. तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं वेगळं अस स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत कंगणाचाही समावेश आहे.

कंगणा एका दिवसाच्या शुटींगसाठी 1.5 कोटी इतकं मानधन घेते तर पुर्ण चित्रपटासाठी कंगणा तब्बल 11 कोटी रुपये मानधन घेते. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्ट दिला आहे.  कंगणाच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आला नाही, मात्र फोर्ब्सच्या 2019च्या यादीनुसार कंगनाने वर्षभरात 17.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दरम्यान, ‘गँगस्टर’ चित्रपटापासून कंगनाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पंधरा वर्षाच्या कालावधीत कंगणाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये तनु वेड्स मनु’, ‘क्वीन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘मणिकर्णिका यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

“कंगणाचं ऑफिस अनधिकृत? असेलही… पण ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे?”

‘त्या पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते’; ‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा!

अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावलेला टेम्पो; पोलिसांनी पकडल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील

कोरोनाच्या आव्हानाला आपण सर्वांनी संधी म्हणून पाहिले पाहिजे- भगतसिंग कोश्यारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या