बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा उपद्रव रोखण्यासाठी जागतिक बँकेकडून 76 हजार कोटी रूपये; भारताला सर्वांत मोठा वाटा

नवी दिल्ली |  कोरोनाने घातलेलं थैमान रोखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी मदतीचे हात पुढे येताना जागतिक बँकेने देखील मोठं सहाय्य केलं आहे. कोरोनावरच्या उपाययोजनांसाठी जागतिक बँकेने 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 76 हजार कोटींचं अर्थसहाय्य केलं आहे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागकित बँकेने केलेल्या सहाय्यापैकी भारताला सगळ्यात मोठा वाटा मिळाला आहे. भारतासाठी ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. कारण भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताना दिसून येतोय. अशा परिस्थितीत बँकेने केलेले अर्थसहाय्य उपयोगी आणि महत्वपूर्ण ठरणार आहे.

कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी जगभरातील देशांना तातडीची मदत म्हणून जागकित बँकेने 1.9 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा म्हणजेच 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स भारताला मिळाले आहेत. या मदतीतून भारताला कोरोना रूग्णांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध करता येतील.

दरम्यान, येत्या दीड वर्षात जागतिक बँक कोरोनाविरोधातील लढाईसाठी 160 अब्ज डॉलर्सची मदत विविध देशांना देणार आहे. या मदतीतून आरोग्याच्या सुविधांचं आधुनिकीकरण तसंच अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याला सहाय्य लाभणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

दारू तस्करीला वळसे पाटलांचा दणका; 1221 गुन्हे दाखल, 472 जणांना अटक

परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती

महत्वाच्या बातम्या-

आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More