बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका!

नवी दिल्ली | अर्थ मंत्रालयाने सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांना त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, अशी सूचना केली आहे. तसेच सर्व विभागाने अनावश्यक खर्च कमी करावा, जेणेकरून आवश्यक ठिकाणी जास्त खर्च करता येईल, असेही निर्देश सरकारने दिले आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका मिळू शकतो.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक सुविधांमध्ये कपात केली जाणार आहे. कॉस्ट कटिंगची ची झळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. सरकारने नॉन-स्कीम खर्चात 20 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे आदेश दिले आहेत.

अर्थ मंत्रालयाने खर्च कमी करण्यासाठी 2019-20 आर्थिक वर्ष निवडलं आहे. यामुळे या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जादा कामाचा भत्ता तसेच इतर अनेक भत्ते कापले जाण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास भत्ता कमी करता येऊ शकतो. याशिवाय सरकारी कार्यालयांचे भाडे कमी करणे शक्य आहे. तसेच स्टेशनरीच्या वस्तू, विजेची बिले, रॉयल्टी, प्रकाशने, प्रशासकीय खर्च, रेशन खर्च इत्यादींचा समावेश या कपातीच्या यादीमध्ये केला जाऊ शकते. तसेच कर्मचाऱ्यांना बक्षिस किंवा बोनस म्हणून देण्यात येणारी रक्कम कमी करणं शक्य आहे.

थोडक्यात बातम्या- 

“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”

ह्रदयद्रावक! कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा

विदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त!

“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More