बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

पुणे | पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 1 हजार 633 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 638 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 13 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. 1 रुग्ण पुण्याबाहेरील होता.

पुण्यात सध्या 351 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,16,463 इतकी आहे. तर पुण्यात 10 हजार 723 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 हजार 937 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,00,803 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 9 हजार 762 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या – 

जॉनी बेयरस्टोला वॉशिंग्टन सुंदर भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंत्रालयातील ‘या’ विभागांमध्ये चालणार दोन शिफ्टमध्ये काम

बकरीसमोर पाऊट करणं पडलं महागात, बकरीने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More