बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवणं आता आणखी महाग; 50 रुपये मोजावे लागणार!

अमरावती | कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक, मित्र-मंडळीची होणारी गर्दी रोखण्यासाठी आता प्लॅटफाॅर्म तिकीट 50 रुपये करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाच्या या नव्या आदेशाची अंमलबजावणी आजपासून होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असताना रेल्वे निरंतरपणे सुरुच आहेत. बाहेरगावाहून नातेवाईक, आप्तस्वकीयांचे आवागमन सुरुच आहे. गर्दीला आवर घालण्याचे निर्देश राज्य आणि केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकीट 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लॅटफाॅर्म तिकीट महाग झाल्यास यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी गर्दी होणार नाही, असा अंदाज रेल्वे विभागाने वर्तविला आहे. आधी प्लॅटफाॅर्म तिकीटासाठी 10 रुपये मोजावे लागत होते. आजपासून 50 रुपये मोजावे लागणार आहेत. प्लॅटफाॅर्मशिवाय फलाटावर प्रवेश केल्यास रेल्वे नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आरपीएफने स्पष्ट केले आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट 50 रुपये केल्याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याऐवजी प्रवेशद्वारावर नियमांचे पालन करण्यासाठी सक्ती असावी, असा सूर उमटत आहे.

50 रुपये प्लॅटफाॅर्म तिकीट करुन नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना सामान्यांची आहे. कोरोना काळात प्लॅटफाॅर्म तिकीट महागडे करुन काय साध्य करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. बडनेरा, अमरावती, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला आणि खंडवा या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकीट लागणार आहे.

दरम्यान, प्लॅटफाॅर्म तिकीट दरवाढीचा निर्णय अन्यायकारक आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र दिले जाईल आणि प्लॅटफाॅर्म तिकीट पुर्वीप्रमाणेच 10 रुपये करावे अशी मागणी केली जाईल, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

थकबाकीदारांची वीज कापणारच; महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या-रजा रद्द

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा

आता लग्नाला फक्त 20 लोकांनाच परवानगी; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू!

महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई

शरद पवार-विश्वास नांगरे पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण; ‘या’ विषयावर झाली चर्चा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More