“साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्याचा पराभव निश्चित आहे”
मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यास मान्यता दिल्यानंतर अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सरकारवर तसेच अनिल देशमुख यांच्यावर टीका देखील होताना दिसत आहे. यातच अभिनेत्री कंगना रनौतने उद्धव ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे.
एका यूझरने एक ट्विट केलं आहे. त्यात तिने लिहिलं आहे की लक्ष्यात ठेवा अनिल देशमुख… जो कोणी कंगना रनौतला संपवायचा आणि त्रास द्यायचा प्रयत्न करेल तो त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगेल. माताराणी कंगनासोबत आहे. या ट्विटला कंगणाने रिट्विट केलं आणि म्हणाली, जो कोणी साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्याचा पराभव निश्चित आहे, असा टोला तिने अनिल देशमुख यांना लगावला आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आता काय काय होतंय, असं म्हणत तिने उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेतलं आहे.
काही दिवसांपुर्वी मुंबई महापालिकेने कंगना रनौतच्या मुंबईच्या बंगल्यावर कारवाई केली होती. त्यामुळे शिवसेना आणि कंगना रनौत यांच्यात राजकारण तापलं होतं. तर या भांडणात आता कंगनाने राष्ट्रवादीला देखील ओढलं होतं. कंगनाने यावर ट्विटरवर आक्रमकपणे टीका केली होती.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून आरोपाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची परवानगी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी
मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
धक्कादायक! मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल हैराण
धार्मिक नियमांचं पालन करत चेन्नईतील ‘या’ खेळाडूने मागितली वेगळी जर्सी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.