मोठी बातमी! मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी मिळाला आणखी एक मृतदेह!
मुंबई | मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळून आला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंब्रा खाडीजवळ रेती बंदर इथं आज सकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी मृतदेह आढळून आल्याची माहिती तातडीने मुंब्रा पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस मुंब्रा खाडी किनाऱ्यावर पोहोचले आहे.
संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. ही आत्महत्या आहे हत्या की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील नाल्यात आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ही व्यक्ती बाजूलाच असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी राहते. तो शौचालयाला खाडीकिनारी आला असावा, त्यावेळी खाडीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या मृतदेहाची सोबत आधार कार्ड पॅन कार्ड सापडले आहे. त्यावरून मुंब्रा पोलीस त्याच्या कुटुंबाचा शोध घेत आहे
थोडक्यात बातम्या-
वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय
नात्याला काळीमा फासणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार
मानवी केसांनी भरलेले 2 ट्रक जवानांनी पकडले, एक किलो केसांची किंमत ऐकून थक्क व्हाल
अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे
मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.