बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारीही वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

राज्यातील कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सातत्याने वाढणाऱ्या या आकड्यामुळे शासन-प्रशासन कडक पावले उचलण्याची शक्यतासुद्धा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज  तब्बल 15 हजार 817 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून पुन्हा काही कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत नवीन 11 हजार 344 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 21 लाख 17 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आता 92.79% इतका झाला आहे. त्यामुळे, राज्य सरकार ही नियंत्रणात आणण्यासाठी कोणते नवे निर्बंध लागू करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यात एकूण आता 1 लाख 10 हजार 485 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

’21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर…’; गोपीचंद पडळकरांंचा राज्य सरकारला इशारा

व्वा पंत! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बॅालिंगवर जबरदस्त ‘रिव्हर्स स्वीप’, पाहा व्हिडीओ

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही- अजित पवार

“मंत्रिपदासाठी पैसे दिलेत, ते वसूल झाल्याशिवाय राजीनामा कसा देईल?”

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More