बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोकं झाले चकित, पाहा व्हीडिओ

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर यूजर्सना छोट्या कासवासारखे दिसणारे हे ‘बीटल्स’ पाहून भलतेच आश्चर्य वाटत आहे. सोनेरी रंगाची ही छोटी छोटी कासवे लोकांच्या चांगलीच पसंतीला येत आहेत. सामान्यत: कासवे आकाराने बरीच मोठी असतात, पण या व्हिडिओत दिसणाऱ्या कासवांसारख्या जिवांचा आकार फारच लहान आहे. हे खरेतर ‘बीटल्स’ नावाचे किडे आहेत. ज्यांचा रंग सोनेरी आहे आणि त्यांचा आकार कासवांसारखा आहे. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हीडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. यासोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे. ‘अनेकदा जे चमकते तेच सोने असते’. हा बीटल दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळतो. लोकांनी ‘गोल्डन टाॅरटाॅईज बीटल्स’ नावाच्या या जिवाला पहिल्यांदाच पाहिले आहे. आणि हा कुठे आढळतो याबद्दलचे आणि इतरही तपशील जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

या व्हीडिओत दिसत आहे की एका इसमाच्या हातात तीन छोटी कासवे म्हणजेच ‘गोल्डन बीटल्स’ आहेत. आणि तो पुन्हा पुन्हा आपले पंख पसरत आहे. या जिवांचे इतके सुंदर रुप क्वचितच कुणी याआधी पाहिले असेल. त्यामुळेच हा व्हीडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आणि लोक त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवत आहेत.

दरम्यान, हे चमत्कारिक ‘गोल्डन टाॅरटाॅईज बीटल्स’ आकाराने छोटेच असतात. त्यांची लांबी 5 ते 7 सेंटीमीटर असते. त्यांच्या रंगातही वैविध्य आढळते. यापैकी ‘बीटल्स’ लाल किंवा भुऱ्या रंगाचे असतात. त्यांच्या अंगावर काळे ठिपके असतात तर काही ‘बीटल्स’ या व्हीडिओत दिसणाऱ्या ‘बीटल्स’ सारखे चमकदार रंगाचे असतात. यांना ‘गोल्डबग’ म्हणजेच ‘सोनेरी किडे’ या नावानेही ओळखले जाते. त्यांना हात लावल्यास त्यांचा रंगही काहीवेळा बदलतो.

थोडक्यात बातम्या – 

अभी तो हम जवान है!; 80 वर्षाच्या दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

अभिमानास्पद! सहाच्या सहा बहिणी पोलिस दलात; अनिल देशमुखांनीही केलं कौतुक

वाढदिवसाला मैद्याच्या केकऐवजी फळांचा केक कापा; सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More