बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पुण्यातील लेडी डॉनला आला राग, स्वतःच्याच प्रियकराची केली हत्या

पुणे | पुण्यामध्ये शबनम नावाची एक महिला स्वतःला ‘लेडी डॉन’ म्हणवून घेत होती. तिने गाडीवरही तसे स्टिकर लावलेले होते. मनी लाँडरींग आणि इतर गुन्हेगारांना बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करणे अशा गुन्ह्यांतही ती अडकलेली होती. शबनम शेख ही विवाहित होती. मात्र, तरीही तिचे सुमित जगताप नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सुमित जगताप याचीही पोलिस ठाण्यात गुन्हेगारी प्रकरणांत नोंद होती.

पुण्यातील ‘लेडी डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेनं तीन साथीदारांच्या मदतीनं प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. शबनम हनिफ शेख, असं या लेडी डॉनचं नाव असून तिनं तिचा प्रियकर सुमित जगताप याची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही घटना घडली त्यावेळी शबनम आणि सुमित हे दारु पित होते. त्याचदरम्यान सुमीत आणि शबनम यांच्यात वाद झाला. सुमितने गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नंतर त्याने तिला मारहाणही सुरू केली. हा सर्व प्रकार पाहून त्याठिकाणी असलेल्या शबनमच्या तीन साथीदारांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हा वाद अधिकच वाढत गेला. त्यानंतर शबनमसह तिच्या तीन साथीदारांनी सुमितला मारहाण सुरू केली. हा प्रकार एवढा विकोपाला गेला की, या चौघांनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने सुमितची हत्या केली.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शबनम आणि सुमित यांच्यात जवळपास दीड वर्षापासून संबध होते.

थोडक्यात बातम्या – 

तरुणानं सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेतल्या, मात्र त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

लॅाकडाऊनमुळं महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराला मिळाला वेळ, मग काय थेट गहू कापायला घेतला!

इतक्या दिवसांचा असू शकतो महाराष्ट्रातील लॉकडाऊन, दोन दिवसात होणार निर्णय!

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

नागरिकांनो तयारी ठेवा!; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात मांडली ‘ही’ महत्त्वाची भूमिका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More