बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

DySP व्हायचं स्वप्न अधुरं, पुण्यात शेतकऱ्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे | मागील वर्षभरापासून कोरोना या विषाणूंने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूंमुळे लाखो जणांना प्राण गमावावा लागला आहे. 6 वर्षांपासुन पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकारी होण्यासाठी मागील 6 वर्षांपासून वैभव प्रयत्न करत होता. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

पोलीस अधिकारी होण्याचं वैभवचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची हळहळ त्याचा चुलत भाऊ अविनाश शितोळे यांनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’शी बोलताना व्यक्त केली. वैभवच्या जाण्याने त्यासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या त्याच्या काही मित्रांनाही हळहळ व्यक्त केली आहे. चुलत भाऊ अविनाश शितोळे यांनी वैभवच्या खडतर प्रवासासंदर्भात ‘लोकसत्ता डॉटकॉम’शी बातचीत केली.

नाशिक येथील श्रीगोंदा तालुक्यातील भांडगाव येथील एका शेतकरी कुटुंबात वैभवचा जन्म झाला. आई, वडील, तो आणि एक बहीण असं त्याचं चौकोनी कुटुंब होतं. आजवर शितोळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालत आला आहे. वैभवचं बारावीपर्यंतचं शिक्षण गावामध्येच पूर्ण झालं. नंतर तो इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी नाशिक शहरामध्ये गेला. पण लहानपणापासून वैभवला पोलीस अधिकारी व्हायचं होतं. ते त्याचं स्वप्न होतं, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मागील महिन्यात स्पर्धा परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यावेळी वैभव देखील शास्त्री रोडवरील आंदोलनात सहभागी झाला होता. विद्यार्थ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तो पुढे असायचा हे सांगत असताना अविनाश शितोळे यांना अश्रू अनावर झाले.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी- फक्त गृहमंत्रीच नव्हे ‘या’ दोन खात्यांचे मंत्रीही बदलणार!

‘या’ नेत्याची गृहमंत्रिपदी नेमणूक करा; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र

कोरोनाबाधित आईसोबत राहण्यासाठी मुलाचा हंबरडा, जिल्हाधिकाऱ्याचे धरले पाय!

कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More