बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारामतीचे व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर

पुणे | वाजले की बारा गाण्याने राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या बारामती तालुक्यातील गुनवडी गावच्या बाबजी कांबळे या रिक्षा चालकास आता मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे. ‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी दोन चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. आज चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी बारामतीत येऊन बाबजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.

काही दिवसांपूर्वी बारामतीच्या एका रिक्षाचालकाने भररस्त्यात आपल्या मित्रांच्या मागणीवर मराठी लावणीवर ठेका धरत अगदी एखाद्या लावणीसम्राज्ञीला लाजवेल असं नृत्य सादर करून दाखवलं होत. आपण आतापर्यंत महिलांना आणि मुलींना एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेलं पाहिलं आहे. पण या रिक्षाचालकाने केलेल्या मनमोहून टाकणाऱ्या नृत्याने समाजमाध्यमावर चांगलीच हवा केली आहे.

बाबजी कांबळे यांची ही लावणी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. गॅस पॉइंट सेंटरवर बराच वेळ लागणार असल्याने मोकळ्या वेळेत काय करायचे असा प्रश्न समोर आला. तेव्हा इतर रिक्षाचालकांनी त्यांना गाण्यावर डान्स करण्याची सुचना केली आणि वाजले की बारा या गाण्यावर अप्रतिम नृत्य कांबळे यांनी केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची माध्यमातूनही दखल घेतली गेली. त्यानंतर निर्माते, दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी बाबजी कांबळे यांची भेट घेत त्यांना आगामी दोन चित्रपटात काम करण्यासंदर्भात करारही केला, असं घनशाम येडे यांनी सांगितले.

दरम्यान, व्हायरल व्हीडिओनंतर थेट चित्रपटात करण्याची संधी मिळाल्यानं बाबजी कांबळे यांनीही आनंद व्यक्त केला आहे. आपण नक्कीच चांगलं काम करुन दाखवू ,असंही कांबळे यांनी सांगितलं आहे.

थोडक्याता बातम्या – 

‘ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे’; ‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

‘ही तर लोकशाहीची चेष्टा’; सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला फटकारलं

हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोकं झाले चकित, पाहा व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More