रायपूर | देशभरात ‘कोरोना’ लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला असताना आता चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतात सध्या सिरम इन्सिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींच्या वापराला मान्यता दिली आहे. या लसींमुळे देशातील ‘कोरोना’ची साथ आटोक्यात येईल, असे आशाचे किरण सर्वांनाच दिसत आहेत. मात्र, छत्तीसगढमध्ये एक काळजी वाढवणारी घटना समोर आली आहे.
छत्तीसगडमधील जिल्हादंडाधिकाऱ्यांनी ‘कोरोना’ लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत. छत्तीसगडच्या जाजगीर भागाचे जिल्हाधिकारी यशवंत कुमार हे गुरुवारी ‘कोरोना’ संक्रमित आढळले आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. त्यामुळे आता ‘कोरोना’ लसीवर नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
यशवंत कुमार यांनी काही दिवसांपूर्वी ‘कोरोना’ लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यांनी पहिला डोस 8 फेब्रुवारी रोजी घेतला होता. त्यानंतर 8 मार्च रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत यशवंत कुमार यांना ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे समोर आले.
दरम्यान, अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. ‘कोरोना’ची लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिकेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! सचिन वाझेंची ‘या’ विभागात करण्यात आली बदली
मोठी बातमी! ‘या’ तारखेला होणार MPSC ची परिक्षा
“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली, संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा
“पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको”
रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!
Comments are closed.