बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा एका क्लिकवर

नवी दिल्ली | सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला आहे. भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा भारतातील कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे.

लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केवळ 279 दिवसांत हा विक्रम घडला आहे. याबाबतच्या अनेक प्रश्नांवर मोदींनी भाष्य केलं आहे.

यावेळी जे बड्या देशांना जमलं नाही ते भारताने करुन दाखवलं, असं मोदी म्हणाले. विक्रमी लसीकरण हे संपुर्ण भारताचं यश आहे.

100 कोटी लोकांचं लसीकरण ही असाधरण गोष्ट आहे मात्र 130 कोटी जनतेच्या एकतेमुळे 100 करोड लसीकरणाचा टप्पा शक्य झाला असल्याचं देकील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

जनतेशी संवाद साधताना दुसऱ्या देशातून लस आणण्यासाठी पैसे कुठून येतील, भारताला लस मिळेल की नाही, भारत लसीकरण करू शकेल का? बरेच लोक, अनेक प्रश्न होते, पण आज हा 100 कोटी डोस प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानाच्या गर्भात जन्माला आला आहे, वैज्ञानिक आधारावर विकसित झाला आहे आणि चारही दिशांना वैज्ञानिक पद्धतींद्वारे पोहोचला असल्याचं देकील मोदी पुढे म्हणाले.

भारताच्या संपूर्ण लसीकरणाचा पाया विज्ञानावर आधारीत आहे. वैज्ञानिक निकषांवर विकसित झालाय. वैज्ञानिक पद्धतीनं संपूर्ण जगभरात लसीकरणाची चर्चा सुरु आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्या सर्वांसाठी लसीकरण ही अभिमानाची बाब आहे. भारताचा लसीकरणाचा कार्यक्रम , Science Born, Science Driven आणि Science Based राहिला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

आज भारतीय कंपन्यांमध्ये केवळ विक्रमी गुंतवणूक येत नाही तर तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. स्टार्ट-अपमध्ये विक्रमी गुंतवणुकीमुळे, स्टार्ट-अप रेकॉर्ड बनवत आहेत.

भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करणे, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणे ही चळवळ चालू करा, असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

स्वच्छ भारत अभियान हे एक जनआंदोनल होतं. त्याप्रमाणं भारतात बनवलेल्या वस्तूंची खरेदी करणं, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणं, वोकल फॉर लोकल होणं या गोष्टी आपण व्यवहारात आणण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

‘हे स्टॉक्स दिवाळीच्या दिवशी खरेदी करा’; SMC Global चा सल्ला

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More