Pune Accident l देशभरात पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण चांगलंच गाजलं आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात एक तरुणाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आरोपीसह त्याचा बचाव करणाऱ्या अन्य दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशातच आता यासंदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबाना मिळणार आर्थिक मदत :
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दोन्ही कुटुंबाचं सांत्वन केलं आहे. तसेच पुण्यात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून दोषींना लवकरात लवकर कठोर शासन कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मृत तरुण, तरुणीच्या पालकांना दिलं आहे.
यावेळी या दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबीयांना पुन्हा सावरता यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कुटुंबाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय देखील एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याशिवाय पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या या घटनेनंतर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून कोणालाही पाठीशी घालू नये असे निर्देशमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहेत.
Pune Accident l या धक्कादायक प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार :
पुणे पोर्शे हिट अँड रन अपघात प्रकरणामुळे पुणे पोलीस आणि प्रशासनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलानं भरधाव कारने दोघांना चिरडलं होतं. या धक्कादायक अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे झाले होते. अशातच सध्या त्या धनिकपुत्राची रवानगी देखील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावं समोर आली होती. या प्रकरणात धनिकपुत्राची आई आणि आजोबा अद्याप अटकेत आहेत. तर, त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे. तसेच, या धक्कादायक प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावं यासाठी सरकार देखील पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
News Title –10 lakhs to the families of the deceased in the Pune Porsche hit and run case
महत्त्वाच्या बातम्या
सावधान! राज्यात फोफावतोय ‘हा’ संसर्गजन्य आजार; वेळीच काळजी घ्या
टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, 595 दिवसांनंतर रोहितसेना इंग्लंडचा बदल घेण्यास सज्ज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय! महायुतीला धक्का बसणार?
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली माय मराठीतून शपथ; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने ‘या’ राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ होणार