“राज्यातल्या अजून 10 नेत्यांना राजीनामा द्यावा लागणार”
मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक खलबतं पहायला मिळाली. सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळालं.
राज्यात सध्या अनेक खुलासे, गौप्यस्फोट सुरु आहेत. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष त्या दाव्यानं वेधलं असल्याचं दिसत आहे.
नवाब मलिक, अनिल देशमुख, अनिल परब, यांच्यावर जोरदार आरोप केले जात असताना अजून 10 नेत्यांना राजीमाना द्यावा लागणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चंगलीच खळबळ माजली आहे.
दरम्यान, आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या, 20 दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी सुनावलं, म्हणाले…
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं जगाला भावनिक आवाहन, म्हणाले…
सकाळचा चहा ठरू शकतो घातक, वाचा ‘हे’ गंभीर परिणाम
IPL खेळाडूंसाठी आणलेल्या बसेस मनसेने फोडल्या, वाचा काय आहे प्रकरण?
तळीरामांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Comments are closed.