कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची लेक, भाजपच्या पहिल्या यादीत नवे चेहरे

Bjp Candidate List | निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या यादीत बहुतांश ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच 10 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नव्या यादीत नेत्यांच्याच नात्यागोत्यात तिकीटे देण्यात आली आहेत. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सख्ख्या भावांना तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत नवे चेहरे

वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. भोकरमधून भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांना राज्यसभा खासदार करण्यात आलं. अशात आता अशोक चव्हाणांच्या लेकीला भोकरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रकाश आवाडे यांच्या लेकालाही भाजपने तिकीट दिलं आहे.

चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी सध्या ते जेलमध्ये असल्याने त्यांच्याजागी त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलं आहे.

ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांना श्रीदोंद्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे.

 महत्त्वाच्या बातम्या- 

पहिल्या यादीत दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट; पाहा कोणाचं तिकीट कापलं

‘या’ भाजप नेत्याच्या लेकीला मिळालं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार

सर्वात मोठी बातमी! भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?

मोठी बातमी! नवनीत राणा यांचं राजकीय पुनर्वसन होणार?

लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाचा सर्वात मोठा खुलासा!