Loading...

शिवसेनेनं करुन दाखवलं! निवडणूक संपताच दहा रुपयांत ‘साहेब खाना’ थाळी सुरु

नवी दिल्ली | गरिबांना पोटभर जेवळ मिळावे यासाठी 10 रुपयांत सकस थाळी देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंनी आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं. याचाच आदर्श घेत जम्मू-काश्मीरमध्ये शिवसेनेकडून दहा रुपयांत ‘साहेब खाना’ थाळी योजना सुरु करण्यात आली आहे.

जम्मूमध्ये ‘साहेब खाना’ थाळी योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिवसेना भवनात गरजू व्यक्तींना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. शिवसेनेचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी ही माहिती दिली आहे.

Loading...

दरदिवशी 500 गरजू लोकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ‘साहेब खाना’ थाळीमध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी असे सकस पदार्थ असणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने यासंबंधीचे वृत्त दिलं आहे.

दरम्यान, 10 रुपयांत सकस जेवन, 1 रुपयांत आरोग्य चाचणी अशा काही महत्वपूर्ण घोषणा शिवसेनेकडून करण्यात आल्या आहेत. मात्र विरोधकांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...