नवी दिल्ली । २०२० वर्षातील आयपीएलचा तेरावा सीजन दुबईमध्ये रंगला होता. यांनंतर आगामी सीजनमध्ये आयपीएलच्यै स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ खेळतील अशी चर्चा होती.
आज बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत आयपीएलमध्ये १० संघ खेळवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली गेलीये.
मात्र येत्या आगामी वर्षात आयपीएसमध्ये आठंच संघ खेळणार आहे. तर २०२२च्या आयपीएलमध्ये दहा संघ एकमेकांशी भिडतानाचा थरार पाहायला मिळणार आहे.
आयपीएलच्या २ नव्या संघांसाठी अदानी ग्रुप तसंच गोएंका हे शर्यतीत असल्याची माहिती आहे. आयपीएलमध्ये १० संघ खेळणार असल्याने स्पर्धेचा कालावधी देखील वाढणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीपेक्षा बेवड्यांची सोय करण्यामध्ये सरकारला जास्त इंटरेस्ट
राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडी
“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”
पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार
‘अशा’प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते; अनिल परब यांनी मनसेवर टीका