बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…

पुणे | यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या शेवटच्या काही विषयांच्या पेपरवर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे एक-दोन विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे साधारणत: मे-जून मध्ये लागणाऱ्या दहावी-बारावीच्या निकालाकडे आता मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागलं आहे. याचविषयी राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी मोठा खुलासा केला आहे.

राज्यातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचं संकलन आणि निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत निकालाची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये उलट-सुलट याविषयी चर्चा सुरू आहे.

साहजिक लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे निकाल लांबणीवर पडणार आहे. परंतू निकालाची तारीख किती असू शकते किंवा निकाल कोणत्या दिवशी लागू शकतो, हे मात्र राज्य मंडळाने आणखी जाहीर केलेलं नाहीये.

ट्रेंडिंग बातम्या-

भारतातील ‘हे’ शहर बनतंय नवं वुहान; मृत्यूदराची आकडेवारी धडकी भरवणारी

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच, आता चीनलाही टाकलं मागं

महत्वाच्या बातम्या-

बहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, चीनने भारताला ललकारलं

“आत्मनिर्भर भारतचे ढोल पिटायचे अन् दुसरीकडे चीनची बाजारपेठ खुली ठेवायची, त्यानेच अर्थव्यवस्था संपली”

“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More