बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची महत्वाची माहिती

मुंबई |  बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याची महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. एबीपी माझाशी बोलत असताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

ICSE आणि ISC बोर्डानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाची आता विद्यार्थी आणि पालकांना ओढ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची लांबली होती. त्यामुळे दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत. दरम्यान, आयसीएसई (ICSE) आणि सीबीएससी (CBSE) बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल देखील लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

महत्त्वाच्या बातम्या-

बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून पण…., सामनातून टीकेचे बाण

“पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी वागू नये”

“दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे… आम्ही म्हटलं, का नया है वह”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More