बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या गंभीर रूग्णांवर उपचारासाठी ठाकरे सरकारने उचललं सर्वांत मोठं पाऊल

मुंबई | कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले

रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन ॲण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर या इंजेक्शनचा उपयोग चांगला होऊ शकेल, त्यामुळे राज्य शासनाने १० हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.

आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तिकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडणारे नसल्याने शासनाने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणित पद्धत (एसओपी) तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

ट्विटरवरून भाजप शब्द हटवण्याच्या चर्चांवर ज्योतिरादित्य शिंदेंनी मौन सोडलं, म्हणतात…

“पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोनावर लस येण्याची शक्यता”

मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More