बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हीही सुन्न व्हाल

नवी दिल्ली | 5 वर्षांच्या भावासोबत वाद झाल्याने10 वर्षाच्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्राजवळील ताजनगरीतील एका गावात घडली आहे. रविवारी सकाळी या मुलीनं गळफास घेवून आपलं जीवन संपवलं.

संबंधित मुलीच्या आईचं यापूर्वीचं निधन झालं आहे, तर वडिलांनी त्यांना वाऱ्यावर सोडून ते कुठेतरी निघून गेले आहेत. या सर्वांचा सांभाळ त्यांची मोठी बहिण करत होती. या घटनेच्या वेळी कामावर गेली होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

किरकोळ कारणावरून पाच वर्षाच्या लहान भावासोबत दहा वर्षाच्या बहिणीचं भांडण झालं होतं. यानंतर राग अनावर झालेल्या बहिणीने घराच्या दाराच्या वरच्या बाजूला असलेल्या अँगलला फास बांधून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्याव, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत, अशी माहितीही पोलीस अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

नितेश राणेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप सिद्ध करावेत, अन्यथा…- वरूण सरदेसाई

…असं काही झालं आणि 2 फुटी अजीम मन्सुरींसाठी वधूंची रांग लागली; ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल!

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर; वाचा काय सुरू, काय बंद?

‘ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करा’; भाजप नेत्यानं ममता बॅनर्जींवर केले धक्कादायक आरोप

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More