ठाणे | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र दिसताना राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोकं वर काढलं आहे. बर्ड फ्लूमुळे 100 कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाल्याने नॉनव्हेज प्रेमींचे मात्र दाबे धणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात अचानक कोंबड्या तडफडून मरायला सुरूवात झाली. मेलेल्या अनेक कोंबड्यांची तपासणी केली असता 300 कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं निदर्शनास आलं.
शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील एका पोल्ट्री फार्ममधील 100 कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोल्ट्रीफार्म मालकाने पशुसंवर्धन विभागाला माहिती दिल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या तात्काळ नष्ट करायचं काम सुरू झालं आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. त्यात बर्ड फ्लूने आणखी एकदा डोकं वर काढायला सुरूवात केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“मी मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो”
“आदित्य ठाकरेंवर मानसिक परिणाम झालेला आहे”
तुम्हालाही ‘या’ चुकीच्या सवयी असतील तर आजच बंद करा, होऊ शकतात गंभीर आजार
…म्हणून विराटने दिलेलं ‘ते’ खास गिफ्ट सचिन तेंडुलकरने परत केलं
“मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल, तुम्हाला वाटत असेल…”
Comments are closed.