पुणे | 100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट अचानक रद्द झाली आहे. प्रशासनाकडून तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे.
मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. यावेळी सर्व राजदूत कोरोना लसीसंदर्भात आढावा घेणार होते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी संबंधित राजदूतांचा हा महत्त्वाचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर असं झालं तर कोरोनाचा संसर्ग संपवण्यात यश येईल.
दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”
“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”
राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय
“गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं”
राष्ट्रवादीकडून ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी अन् शिवसेनेला मोठा दिलासा!