एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं लक्ष्य मग अख्ख्या राज्य सरकारसमोरील लक्ष्य किती असेल- पूनम महाजन
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार पूनम महाजन यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर आगपाखड केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यासमोर दर महिन्याला 100 कोटी वसुलीचं लक्ष्य तर अख्ख्या राज्य सरकारसमोरील दरमहा वसुली लक्ष्य किती?, असा सवाल पूनम महाजन यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये खंडणीसरकार असा हॅशटॅग वापरला आहे.
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजीनाम्याची मागणी होत असताना अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुखांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या आरोपांवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यासमोर दरमहा 100 कोटी वसुलीचं लक्ष्य, तर अख्ख्या राज्य सरकारसमोरील दरमहा वसुली लक्ष्य किती?#त्रैराशिक #AnilDeshmukh #खंडणीसरकार
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) March 20, 2021
थोडक्यात बातम्या-
“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”
‘…तर आदरणीय पवारजींना जाब विचारायला हवा’; काँग्रेस नेत्याचा शरद पवारांवर निशाणा
सरकारमधील प्रत्येकानं आपले पाय जमिनीवर आहेत का पाहावं- संजय राऊत
‘…म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा होता’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा- तृप्ती देसाई
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.