Top News राजकारण

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!

मुंबई | विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 100 पत्रं लिहीली आहेत. मात्र त्यापैकी एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलेलं नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2020 याकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक लिहीली आहेत. मात्र या पाठवलेल्या पत्रांना उत्तरंच मिळालेली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना यापूर्वी सांगितलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अनेक पत्र लिहीली. त्यापैकी एकाही पत्राचं उत्तर मला मिळालेलं नाही. मात्र त्या पत्रातील बाबींवर सरकारने विचार केला त्यातच माझं समाधान आहे.

राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना चाचण्या वाढवण्याची मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.

महत्वाच्या बातम्या-

“खडसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू”

मुंबई, महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्यांचा कंगणावर हल्लाबोल

“देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हा, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान हवा आहे”

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?- नितेश राणे

राज्यातील तरूणांनी उद्योगधंद्याकडे वळावं; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या