बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

मुंबई | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे. रुपयाची घसरण आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात केलेली विक्री यामुळे बाजारावर दबाव येत आहे. तसेच काही स्टॉवरही परीणाम झाला आहे.

शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आणि बीग बुल म्हणून ओळख मिळालेले राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार वेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या शेअर्सचा समावेश आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

राकेश झुनझुनवाला यांना या शेअर्सच्या प्रचंड विक्रीमुळे गेल्या आठवड्यात 1,000 कोटी रुपयांहुन अधिक नुकसान झालं आहे. गेल्या आठवड्यात टायटनच्या शेअर्सची  किंमत 5 ट्रेडिंग सत्रामध्ये 2,053.50 रुपयांवरुन 1,944.75 रुपये प्रती शेअरवर घसरली. टायटनच्या शेअरमध्ये 108.75 रुपयांची घसरण झाली. त्याचवेळी, स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 531.10 वरुन 475.90 रुपयापर्यंत घसरली. गेल्या आठवड्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत प्रती शेअर 55.20 रुपयांची घसरण झाली.

जानेवारी – मार्च 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डींग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांची टायटनमध्ये एकूण 3,53,10,395 शेअर्स आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे 95,40,575 शेअर्स आहे. झुनझुनवाला दांपत्याकडे टायटनचे एकूण 4,48,50,970 शेअर्स आहेत. तसेच राकेश झुनझुनवाला स्टार हेल्थचे एकूण 10,07,53,935 शेअर्स आहेत. गेल्या आठवड्यात झुनझुनवाला यांचे टायटन 485 कोटी आणि स्टार हेल्थचे 555 कोटी असे तब्बल 1,040 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

थोडक्यात बातम्या –

‘परिक्षेचा निकाल आधीच लागला’; प्रसाद लाड यांचं मोठं वक्तव्य

“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”

शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More