बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाकाळात देशातील 10 हजार कंपन्या बंद; महाराष्ट्रातील आकडा पाहून व्हाल थक्क!

नवी दिल्ली | लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी गेल्या दहा महिन्यात देशातील तब्बल दहा हजार कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली आहे. 2020 मध्ये देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि लॉकडाऊन करण्यात आला. सर्वच क्षेत्रांवर त्याचा दुरगामी परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.

एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या दहा महिन्याच्या कालावधीत देशातील एकूण 10 हजार 113 कंपन्यांनी स्वतःच्या मर्जीने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई झाल्यामुळे या कंपन्या बंद झाल्या नसल्याचं अनुराग सिंह ठाकुर यांनी स्पष्ट केलं आहे.

देशातील बंद झालेल्या कंपन्यांच्या पहिल्या 5 राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तरप्रदेशचा समावेश आहे. दिल्लीमध्ये देशातील सर्वात जास्त 2394 कंपन्या बंद झाल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात 1269, तामिळनाडूत 1312, उत्तरप्रदेशात 1936 तर कर्नाटकात 836 कंपन्यांनी व्यवसायातून स्वच्छेने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी कारण लाॅकडाऊनच्या काळात कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. देशभरात करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले तसे अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. काही कंपन्यांना यामधून उभारी घेण्यात यश मिळालं. परंतु, काहींना कंपनी बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

थोडक्यात बातम्या-

एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादायक पाऊल!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत!

‘…म्हणून इंधनाच्या कार वापरणार नाही’; नितीन गडकरींनी वळवला इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा

महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर पार्थ पवार, म्हणाले…

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More