बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी | 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

वाशिम | एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलेल्या अनेकांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. आता वाशिम जिल्ह्यातील एका 101 वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. या आजींना ना काही दिसतं ना ऐकायला येतं. अशा स्थितीतही त्यांना कोरोनाची भीती नव्हती आणि म्हणूनच वय 101 वर्षे असतानाही त्यांनी कोरोनाला हरवलं आहे.

जयवंताबाई गंगाराम रंजवे असं या आजीबाईंचं नाव आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील भोकरखेडा गावच्या त्या रहिवासी आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आजीबाईंचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आजींचा सिटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा त्यांचा HRCT स्कोर 12 असल्याचं लक्षात आलं. त्यानुसार डॉक्टरांनीही आजींवर उपचार सुरु केले.

कुटुंबियांनी त्यांना कवठा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. तिथे त्यांच्यावर डॉक्टरांनी योग्य उपचार केले आणि आजी ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.

दरम्यान, बारामती तालुक्यातील पैलवान दादासो बडे यांची दोनदा बायपास सर्जरी झाली. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांना डेंगुचा आजार झाला होता. त्यावरही त्यांनी यशस्वीरित्या मात केली. पण पुन्हा तब्येत बिघडली. या दरम्यान दादासो बडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. यानंतर कुटुंबीय चिंतेत पडले. बारामती येथील एका हॉस्पिटलमध्ये दादासो बडे यांना दाखल केलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर आठ दिवसातच प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर पैलवान दादासो बडे यांना कोरोनावर यशस्वी मात केली.

थोडक्यात बातम्या- 

“आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय”

प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड ‘डोमिनोज’ कंपनीचा डेटा लिक; ग्राहकांची ‘ही ‘ माहिती डार्क वेबवर उपलब्ध

‘मोदी लाईव्ह येऊन रडणार’; ‘या’ खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी, पाहा व्हिडीओ 

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवारांनी केलेल्या त्या कृ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More