बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल!

नवी दिल्ली | दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच राकेश अस्ताना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश अस्थाना हे सीबीआयचे माजी संचालक राहिले आहेत. अस्थाना यांची आयुक्तपदावर नियुक्ती केल्यानंतर दिल्ली सरकारने त्यांच्या नियुक्तीला जोरदार विरोध केला. दिल्ली सरकारने त्याविरूद्ध विधानसभेत प्रस्ताव पारित केला आहे. त्यानंतर केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.

ज्येष्ठ वकिल मनोहर लाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरूद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. राकेश अस्थाना यांची केलेली नियुक्ती ही नियमबाह्य असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळेच या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका दाखल केल्याचं शर्मा यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, सर्व नियुक्त्या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व्हायला हव्यात. ज्यांचा कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी राहिला आहे. त्यांची आयुक्तपदी नियु्क्ती केली जाऊ शकत नाही, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ 6 महिन्यांपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती करणं चुकीचं असल्याचं मनोहर लाल शर्मा यांनी याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीच्या आयुक्तांची नियुक्ती करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारवर असते. केंद्र सरकारने अस्थाना यांची नुकतीच दिल्लीच्या आयुक्तपदी केली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेत अस्थाना यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर

कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत

‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित

एसटी कर्मचाऱ्यांची दादागिरी; वृद्धाला जबर मारहाण, पाहा व्हिडीओ

एकतर्फी प्रेमातून विवाहितेनं उचललं हे टोकाचं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More