Narendra Modi1 1 - मोदींकडून मिनी रोड शो, काँग्रेसकडून आचारसंहिता भंगाचा आरोप
- देश

मोदींकडून मिनी रोड शो, काँग्रेसकडून आचारसंहिता भंगाचा आरोप

अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशीही मतदारांना आकर्षित करण्याची संधी सोडली नाही. साबरमतीतील राणिप मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर त्यांनी मिनी रोड शो केला. 

काँग्रेसने मोदींच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे. मोदींनी रोड शो करुन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केलीय. तसेच याप्रकरणी कारवाईची मागणी केलीय. 

दरम्यान, वाहिन्यांना मुलाखत दिल्यामुळे कालच निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवला आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा