मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. या नव्या सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा कारभार सुरु झाला. अद्याप खाते वाटप झालेलं नाही. त्यामुळे आता दोघंही नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे. हे सरकार भाजपच्या पाठिंब्यामुळे तयार झालं. भाजपचे पक्षश्रेष्ठी गुजरातचे आहेत. त्यामुळे ज्याप्रकारे शिंदे गटाचे आमदार भाजपला मिळाले. त्यावरुन असॆ दिसतॆ की, मुंबई गुजरातला नेण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, असं मिटकरी म्हणालेत.
106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही. पण 106 जन आता तीच मुंबई गुजरातला मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत, असं अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. या ट्विटला मिटकरी यांनी मनाला पटतंय बघा असं शिर्षक दिलं आहे. याआधी देखील त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहून अशीच खोचक टीका केली होती.
कोरोना काळानंतर आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून दीक्षांत समारंभाला स्वत: हजर राहत आहात. विद्यापीठ सदस्य म्हणून आपणास भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करताना आनंद होत आहे, असं मिटकरींनी पत्रात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”
राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; अति मुसळधार पावसाची शक्यता
आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा लेकाच्या पक्षाला रामराम
शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“शिवसेना पुन्हा कधीच उभी रहाणार नाही, शिवसेनेेची आजची अवस्था ठाकरे पिता-पुत्रामुळेच”
Comments are closed.