नवी दिल्ली | दिल्ली मधील 106 वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला यशस्वी लढा दिला आहे. एवढंच नाही तर ते ठणठणीत होऊन घरीही परतले आहेत.
कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्या 106 वर्षांच्या आजोबांना राजीव गांधी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर या आजोबांच्या पत्नी, मुलगा आणि कुटुंबातील इतरांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
या 106 वर्षीय रुग्णाने या अगोदर 1918 साली स्पॅनिश फ्लू पाहिला होता. त्यावेळी स्पॅनिश फ्लूने जगभरात हाहाकार माजवला होता. स्पॅनिश फ्लूच्या महासाथीच्या वेळी ते केवळ 4 वर्षांचे होते.
दरम्यान, ‘स्पॅनिश फ्लू’मुळे चार ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच त्यावेळी असणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या 1.7 टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित
आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची काळजी करावी- देवेंद्र फडणवीस
कोणत्याही हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये- उद्धव ठाकरे
राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार- उद्धव ठाकरे
Comments are closed.