महाराष्ट्र मुंबई

106 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात!

मुंबई | 106 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. आनंदी पाटील असं या आजीबाईंचं नाव आहे. डोंबिवली पश्चिम येथे आनंदी पाटील राहतात.

या आजीबाईंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सावळाराम कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आठवडाभरात 106 वर्षाच्या आनंदीबाई यांनी कोरोनावर मात केली आहे. आजीबाईंनी कोरोनावर मात केल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटद्वारे वनरुपी क्लिनिकचे डॉ राहुल घुले, पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.

यशस्वी उपचार घेतल्यानंतर आनंदीबीई या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘अनुराग कश्यपला अटक करा’; कंगणा राणावतची मागणी

“आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल”

‘मी आधीही सांगितलंय आणि पुन्हा एकदा सांगतो…’; सभागृहात विरोधकांच्या गदारोळानंतर मोदींचं ट्विट

“केंद्राने मान्य करावं, देशात समूह संसर्ग झाला आहे”

राज्यसभेत प्रचंड गदारोळ; खासदाराने सभापतींसमोरच नियम पुस्तक फाडलं

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या