Sushilkumar Shinde Sharad Pawar - शरद पवार भावी राष्ट्रपती; सुशीलकुमार शिंदेंची भविष्यवाणी
- पुणे, महाराष्ट्र

शरद पवार भावी राष्ट्रपती; सुशीलकुमार शिंदेंची भविष्यवाणी

पुणे | माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार होऊ शकला नाही, मात्र व्यासपीठावर शरद पवार उपस्थित आहेत आणि ते भावी राष्ट्रपती आहेत, असं काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. 

प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ‘भारताची प्रतिभा’ जीवनग्रंथाचे आणि वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. 

दरम्यान, सुशीलकुमार यांनी भावी राष्ट्रपती असा उल्लेख करताच शरद पवार यांनी नकारार्थी हात हलवला. मात्र हाच त्यांचा होकार आहे, मी त्यांची करंगळी पकडून राजकारणात आलो, असं सुशीलकुमार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा