पुणे महाराष्ट्र

पुणेकरांनो काळजी घ्या; ब्रिटनहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता!

पुणे | इंग्लंडवरून आलेल्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचा पत्ता आणि फोन नंबरप्रमाणे संपर्क होत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.

इंग्लंडहून 1 डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा शोध लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. प्रवाशांची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना दिली असून त्यापैकी 109 जणांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

पुण्यात आलेल्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याचे यात सांगण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी याबाबत पोलिसांना पत्र दिले आहे.

कोरोना नवीन विषाणू आढळून आल्याने राज्य सरकारने परदेशातून 1 डिसेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करावी व त्यांना इतरांपासून विलग करून रूग्णालयात दाखल करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

वर्षा संजय राऊत यांचं ईडीला पत्र; केली ‘ही’ मागणी

“अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असता”

खळबळजनक! विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या, रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

“स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यात काँग्रेसचं योगदान मोठं आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या