Top News महाराष्ट्र मुंबई

दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार!

मुंबई  |   कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेल्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबरपर्यत आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यत आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केलंय.

फेब्रुवारी-मार्च 2020 मधील नापास विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेतंर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसू इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

महत्वाच्या बातम्या-

‘देशात कोरोना समूह संसर्ग’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, अन्यथा…- नवनीत राणा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीडित कुटुंबांसाठी तेलंगणा सरकारने केली मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या